Posts

Upgrade                   आजकाल upgrade हा शब्द आपल्या रोजच्या जीवनातील एक भाग झाला आहे .सकाळी  हातात घेतला कि मॅसेज येतो कि या  app चे   upgrade   2G 3G 4G  करत upgrade होत आहेत. अहो एवढच काय  आपल्या रोजच्या जीवनातील टूथपेस्ट , मीठ, साबण सारे काही upgrade  होत आहे. एका गोर बनवणाऱ्या क्रीमच तर मला आश्चर्य वाटतं दर  सहा महिन्यांनी एक नवीनversion  काढतात आणि म्हणतात best ever fairness ,  मग या आधी आमहाला विकलेली वस्तू कमी दर्जाची होती का?                   असो काळ हा पुढे जबणार आणि आजपेक्षा उद्या काहीतरी नवीन संशोधन होणार.  आणि जग बदलत राहणार.  बदल हा जगाचा नियमच  आहे. पण हे जग जितक्या वेगाने बदल स्वीकारतोय तितक्या वेगाने आपण बदललो नाही तर? तर  आपण प्रवाहाबाहेर फेकले जाऊ, Outdated होऊ.                     आता साधच उधाहरण पहा आपल्या घरातली ज्येष्ठ ...
कर्माचे फळ आणि नशीब                     आपल्याला नेहमीच असा प्रश्न पडतो कि आपण नेहमीच चांगलं वागतो, कुणाच्या वाईटाचा स्वप्नात देखील विचार करत नाही.  तरीही आपल्या सोबत वाईट का घडत? त्याचवेळी आपल्या डोळ्यासमोर असे अनेक उदाहरण असतात जे वाईट वागत असतात परंतु त्यांचं सगळं आलबेल चाललं असत.  हे कस काय? आपल्याला तर लहानपणी पासून शिकवलं जात कि जे पेराल तेच उगवेल.  पाप केलं तर तुम्हाला यातना भोगाव्या लागतील,  आणि पुण्य केलं तर तुम्ही सुखी व्हाल.  साक्षात भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे "कर्मण्ये वाधिकारासये...." पण आपल्या डोळ्यासमोर तर वेगळीच परिस्थिती आहे,  चुकीच्या मार्गानी पैसे कमावणारा आपले सगळे शानशौक पुरे करतोय तर कष्टाने,  सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम करणारा मात्र छोट्या छोट्या गरजांसाठी लाचार आहे.                      इथेच कर्म सिद्धांत काम करत असत.  आपल्या भारतात अशी मान्यता आहे कि कुठलही मूल जन्माला आलं कि पाचवीच्या दिवशी सटवाई येऊन...

निर्णय

निर्णय .             क्रिकेटचा सामना सुरु होता, अतिशय निर्णायक वळणावर मॅच आली होती.  दोन बॉल आणि आठ रन, आता बॅट्समनची खरी परीक्षा होती.  स्टेडियम मधले प्रेक्षक अक्षरशः श्वास रोखून बसलेले आणि तीच स्थिती घरी बसलेल्या प्रेक्षकांची...  बॅट्समनच्या डोळ्या समोर एकाच वेळी अनेक पर्याय येऊन गेले . दोन चौके किंवा एक सिक्सर आणि दोन रन, पण सिक्सर मारायला गेल्यावर कॅच आऊट झालो तर.... आणि दुसऱ्या बॉलवर सिक्स घ्यायचा ठरवलं तर ते बॉलर च्या बॉलिंग वर अवलंबून , सगळ्या लोकांचे डोळे त्या बॅट्समनकडे लागलेले...                अशी अटीतटीची परिस्थिती आपल्या हि आयुष्यात खूपदा येतात.  जेव्हा निर्णय घेणे हे गरजेचे असते.  पण त्या निर्णयाचा परिणाम काय होईल हे सांगता येत नाही.  तो निर्णय एकतर बरोबर ठरतो किंवा चुकीचा ठरतो.  खूपदा चुकीचा ठरलेला निर्णय हा लोकांचा निर्णय घेण्याचा आत्मविश्वास सुद्धा हिरावून घेऊ शकतो...                निर्णय चूक असला तरी तो आपल्याला अ...