निर्णय

निर्णय. 

           क्रिकेटचा सामना सुरु होता, अतिशय निर्णायक वळणावर मॅच आली होती.  दोन बॉल आणि आठ रन, आता बॅट्समनची खरी परीक्षा होती.  स्टेडियम मधले प्रेक्षक अक्षरशः श्वास रोखून बसलेले आणि तीच स्थिती घरी बसलेल्या प्रेक्षकांची...  बॅट्समनच्या डोळ्या समोर एकाच वेळी अनेक पर्याय येऊन गेले . दोन चौके किंवा एक सिक्सर आणि दोन रन, पण सिक्सर मारायला गेल्यावर कॅच आऊट झालो तर.... आणि दुसऱ्या बॉलवर सिक्स घ्यायचा ठरवलं तर ते बॉलर च्या बॉलिंग वर अवलंबून , सगळ्या लोकांचे डोळे त्या बॅट्समनकडे लागलेले...

               अशी अटीतटीची परिस्थिती आपल्या हि आयुष्यात खूपदा येतात.  जेव्हा निर्णय घेणे हे गरजेचे असते.  पण त्या निर्णयाचा परिणाम काय होईल हे सांगता येत नाही.  तो निर्णय एकतर बरोबर ठरतो किंवा चुकीचा ठरतो.  खूपदा चुकीचा ठरलेला निर्णय हा लोकांचा निर्णय घेण्याचा आत्मविश्वास सुद्धा हिरावून घेऊ शकतो...

               निर्णय चूक असला तरी तो आपल्याला अनुभव देतो आणि बरोबर असला तर यश आणि आत्मविश्वास.  त्यामुळे निर्णय घेणे हे टाळू नये, कारण माणूस कुठल्याही गोष्टीत निर्णय घेतल्या शिवाय पुढे जाऊ शकत नाही.  बऱ्याचदा असं पाहायला मिळते की पालक मुलांच्या प्रत्येक गोष्टीचे निर्णय स्वतः घेतात.  अश्या मुलांमध्ये मोठेपणी डिसिजन मेकिंग चा अभाव जाणवतो.  तर काही लोक पटापट निर्णय घेऊन कामे मार्गी लावतात.  त्यामुळे मुलांना त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय घेण्याचे स्वात्यंत्र लहानपाणी पासूनच द्यावे, म्हणजे मोठेपणी त्यांना निर्णय घेतांना त्यांच्या कडून चुका होणार नाही.

               काही लोक निर्णय घेण्याचा टाळतात कारण परिणामांच खापर आपल्यावर फुटायला नको.  पण स्वतः घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारण्याची सवय माणसाने स्वतःला लावावी, निर्णय घेणं हीच यशाची पहिली पायरी आहे आणि गमकही.
              मात्र निर्णय घेतांना काही पथ्येही पाळायला हवी,सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोकं शांत ठेऊन निर्णय घ्यायला हवा, खूप रागात असतांना किंवा उत्साहात निर्णय घेऊ नये . आणि निर्णयाचे परिणाम जरी माहिती नसतील तरी कुठलाही निर्णय घेतांना थोडं संशोधन करावं .त्या साठी आपल्याला आता गूगल ची मदत हि घेता येते

- सौ. दिपाली हातेकर. 

Comments

Post a Comment