Upgrade
आजकाल upgrade हा शब्द आपल्या रोजच्या जीवनातील एक भाग झाला आहे .सकाळी हातात घेतला कि मॅसेज येतो कि या app चे upgrade 2G 3G 4G करत upgrade होत आहेत. अहो एवढच काय आपल्या रोजच्या जीवनातील टूथपेस्ट , मीठ, साबण सारे काही upgrade होत आहे. एका गोर बनवणाऱ्या क्रीमच तर मला आश्चर्य वाटतं दर सहा महिन्यांनी एक नवीनversion काढतात आणि म्हणतात best ever fairness , मग या आधी आमहाला विकलेली वस्तू कमी दर्जाची होती का?असो काळ हा पुढे जबणार आणि आजपेक्षा उद्या काहीतरी नवीन संशोधन होणार. आणि जग बदलत राहणार. बदल हा जगाचा नियमच आहे. पण हे जग जितक्या वेगाने बदल स्वीकारतोय तितक्या वेगाने आपण बदललो नाही तर? तर आपण प्रवाहाबाहेर फेकले जाऊ, Outdated होऊ.
आता साधच उधाहरण पहा आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी ज्यांनी आपल्या लहान पणी वीज सुद्धा पहिली नव्हती ते आज स्मार्ट फोन लीलया वापरत आहे. जर त्यांनी या नवीन गोष्टी शिकल्या नसत्या तर ते इतरांशी संपर्कात राहू शकले असते का? आणि आज जे Smart Phone हाताळू शकत नाही त्यांना आपल्या आत्मविशास कमी असल्याचं जाणवू लागत त्यांची अनेक कामे अडतात. नोकिया सारखी मोठी कंपनी जेव्हा काळा बरोबर चालू शकली नाही तेव्हा ती देखील प्रवाह बाहेर फेकल्या गेली. आज काळ आपली निम्मी कामे Online होतात. पण आज जर आपण हे करायला शिकलो नाही तर उद्या आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. हे झाले ज्ञानाच्या बाबतीत upgrade होणे.
ज्ञाना सोबतच आपले राहणीमान आणि आपली मानसीकता हि upgrade व्हायला हवी. आजकाल कुणाची आजी नववारी नेसते? उलट साडी हि जाऊद्या आजकाल जीन्स घालण्याऱ्या आज्या आपल्याला पाहायला मिळतात. जुन्या रीती परंपरांना फाटा देऊन मजा करायला लागल्यात. पण ही काळाची गरजच आहे. जुने विचार हे बूरसटलेले नसतात तर त्यांच्यातले चांगले घेऊन त्याला नव्याची जोड देऊन जीवनाचा आनंद घेणे हेच तर upgradation आहे.
याच प्रकारे आपल्याला मानसिकरीत्या upgrade होणे गरजेचे आहे. आजकाल आपल्या आजूबाजूला मुलंमुली एकत्र फिरताना दिसतात त्यावेळी आपण सहज म्हणतो की आमच्या वेळी असे नव्हते, पण आपण हा बदल स्वीकारायला हवा. नवीन पिढी मध्ये जो मोकळे पणा आहे, मुलामुलींना मध्ये निखळ मैत्री सुद्धा होऊ शकते हे आपण स्वीकारायला हवे, नाही तर नवीन पिढी आणि जुनी पिढी यातील संघर्ष वाढेल. लग्नसंस्था हि आता किती upgrade झाली आहे. थेट बोहल्यावर भेटणारे नवरी नवरदेव आता आपले लग्न आधी चार भेटी घेऊन, एकमेकांशी नीट ओळख करून स्वतःहा ठरवायला लागली आहे.
- सौ दिपाली हातेकर.
Comments
Post a Comment